कुछ तो लोग कहेंगे, स्मृती इराणींचा नाराजी लपवण्याचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम | 06 Jul 2016 11:00 AM (IST)
नवी दिल्ली : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी आज आपला नवा पदभार स्वीकारला. मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेतल्यामुळे आपण नाराज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. काही जणांना वस्त्रोद्योग मंत्रालयाविषयी माहिती नसल्यामुळे ते चुकीचा अर्थ काढत आहेत. 'कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना' असा फिल्मी डायलॉग मारत त्यांनी आपली नाराजी लपवली. इतकंच नाही तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनाही त्यांनी टोला मारला.