जम्मू-काश्मीर: लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, 3 जवान शहीद
एबीपी माझा वेब टीम | 17 Aug 2016 03:23 AM (IST)
बारामुला (जम्मू-काश्मीर): जम्मू काश्मीरमध्ये बारामुलामध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन जवानांसह एक पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. बारामुलातील ख्वाजाबाग परिसरात लष्कराच्या तुकडीवर हा हल्ला करण्यात आला. दोन ते तीन दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती सध्या मिळते आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, रात्री अडीज वाजेच्या सुमारास अतिरेक्यांनी हल्ला केला. हल्ला करुन दहशतवाद्यांनी तिथून पळ काढला. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. 15 ऑगस्टला देखील दहशतवाद्यांनी असाच हल्ला केला होता. यामध्ये सीआरपीएफ कंमांडंट शहीद झाले होते. पण त्यांनी त्याआधी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. याच दरम्यान, भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, 60 ते 70 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे.