जमिनीपासून 160 फूट उंच आणि 428 वर्ष जुना चारमिनार ही ऐतिहासिक वास्तू आहे. भारतासह जगभरातून अनेक पर्यटक या प्रसिद्ध वास्तूला भेट देतात. कुतुब साम्राज्याचा पाचवा शासक सुलतान मुहम्मद कुली कुतब शाहने 1591 मध्ये चारमिनार बांधला होता. मुसी नदीच्या पूर्व किनाऱ्यावर चारमिनार बांधला आहे. चारमिनार म्हणजे चार खांब जे एकमेकांना जोडलेले आहेत.
याआधीही चारमिनारच्या पश्चिमेकडील काही भाग कोसळला होता. दररोज देश-विदेशांतील हजारो पर्यटक चारमीनारला भेट देतात. ही इमारत सध्या नाजूक परिस्थितीत असल्याने पर्यटकांना केवळ पहिल्या मजल्यापर्यंतच जाण्याची परवानगी आहे.