Tata-Mistry Case : सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून काढलेल्या प्रकरणावर सुप्रीम कोर्ट करणार पुनर्विचार करणार आहे. या प्रकरणाची 9 मार्च 2022 रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. 26 मार्च 2021 रोजी दिलेल्या निर्णायावर सुप्रीम कोर्टा पुनर्विचार करणण्याचा निर्णय घेतला आहे. 2016 मध्ये टाटा समुहाने सायरस मिस्त्री यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार केले होते. याप्रकरणी सायरस मिस्त्री यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावेळी कोर्टाने टाटा समुहाच्या बाजूने निर्णय दिला होता.
मुख्य न्यायाधीश एनव्ही रमण, न्यायाधीश एएस बोपन्ना आणि न्यायाधीश व्ही रामसुब्रमण्यम या तीन जणांच्या खंडपीठाने 2:1 च्या बहुमताने 15 फेब्रुवारीच्या पुनर्विचार याचिकाला सहमती दर्शवली आहे. 9 मार्च रोजी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
2016 साली सायरस मिस्त्री यांना चेअरमन पदावरून काढलं होतं
सहा वर्षापूर्वी 2016 मध्ये, सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून काढण्यात आलं होतं. त्याविरोधात सायरस मिस्त्री यांनी कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून त्याला आव्हान दिलं होतं. डिसेंबर 2019 मध्ये NCLAT ने मिस्त्रींना अशा पद्धतीने पदावरून काढण्याच्या निर्णयाला चुकीचं ठरवलं होतं. ते पद त्यांना परत देण्यात यावं असंही सांगितलं होतं. टाटा ग्रुपने या विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने NCLAT च्या आदेशाला स्थगिती दिली होती. 26 मार्च 2021 सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने टाटा समूहाच्या अध्यक्षपदावर सायरस मिस्त्री राहू शकत नाहीत, असा निर्णय दिला होता. दुसरीकडे शपूरजी पालनजी ग्रुपनेही सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यांनी आपल्या तक्रारीत सांगितलं होतं की मिस्त्रींना ज्या नियमांच्या आधारे काढण्यात आलं होतं त्या नियमांना NCLAT ने रद्द केलं नव्हतं. त्यामुळे भविष्यातही असा निर्णय होऊ शकतो.
दरम्यान, सायरस मिस्त्री यांचं शिक्षण लंडनमध्ये झालंय. इंपेरियल कॉलेजमध्ये त्यांनी सिव्हिल इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलंय. सायरस मिस्त्री यांनी त्यानंतर लंडन बिझनेस स्कूलमधून मॅनेजमेंटमधून शिक्षण घेतलं.