Serum Institute of India Covovax Covid vaccine  : देशातील सर्वात मोठी लस निर्मिती कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट, पुणे यांनी कोवोव्हॅक्स लसीला मुलांच्या वापरासाठी आप्तकालीन परवानगी द्यावी, अशी मागणी DCGI कडे केली आहे. 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी कोवोव्हॅक्स या लसीच्या वापरासाठी आपत्कालीन मान्यता द्यावी, अशी मागणी सीरमने औषध नियामक प्रशासनाने (DCGI) सोमवारी केली आहे. पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे.


12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी कोवोव्हॅक्स या लसीच्या वापरासाठी आपत्कालीन मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठीची सर्व कागदपत्ते आणि अर्ज  सीरम लवकरच DCGI कडे जमा करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, सीरम इन्स्टिट्यूटचे government and regulatory affair संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी कंपनीच्या आवेदनात म्हटलेय की, 12 ते 17 वयोगटातील दोन हजार 707 जणांवर घेण्यात आलेल्या चाचण्यात सकारात्मक निकाल आला आहे. कोवोव्हॅक्स लस प्रभावी, रोगप्रतिकारक आणि सुरक्षित असल्याचे या चाचणीतून समोर आलेय. कोवोव्हॅक्स लस देशात आणि जगभरातील मुलांच्या लसीकरणात महत्वाची भूमिका बजावेल.


औषध नियामक प्रशासनाने 28 डिसेंबर 2021 रोजी वयोवृद्धांसाठी कोवोव्हॅक्स लसीला आप्तकालीन मंजूरी दिली होती. तसेच 17 डिसेंबर 2022 रोजी जागतिक आरोग्य संघटानेने आप्तकालीन मान्यता दिली होती.  दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत पात्र लोकांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यात येत आहे. सध्या 15 वर्षाच्या पुढील प्रत्येकाला लस मिळत आहे. तर येत्या काळात लहान मुलांना लस देण्यात येणार आहे. 


Corbevax लसीला DCGI ची मान्यता
12 वर्षांवरील मुलांसाठीच्या Corbevax या लसीला आपत्कालीन मान्यता देण्यात आली आहे. हैदराबादच्या 'बायोलॉजिकल ई' (Biological E) कंपनी निर्मित असलेली 'कॉर्बेवॅक्स' (Corbevax) या लसीला औषध नियामक प्रशासनाने (DCGI) सोमवारी आपत्कालीन मन्यता दिली आहे. त्यामुळे आता भारतातील लसीकरणाला आणखी वेग मिळणार आहे. याआधी भारतात 15 वर्षांवरील मुलांना लस दिली जात होती. आता 12 वर्षांवरील मुलांना लस देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.