कृष्णगिरी (तमिळनाडू) : राज्यातील कृष्णगिरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. २५ वर्षीय विवाहित महिलेने आपल्या समलैंगिक साथीदारासह आपल्या पाच महिन्याच्या मुलाचा खून (TamilNadu Crime News) केल्याप्रकरणी दोघींना अटक करण्यात आली आहे. ही घटना २ नोव्हेंबर रोजी केलमंगलम परिसरात घडली. पोलिसांनी अटक केलेल्या महिलांची नावे एस. भारती (२५) आणि सुमित्रा (२२) अशी असून, दोघीही चिन्नट्टी गावातील रहिवासी आहेत.(TamilNadu Crime News)

Continues below advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, भारतीचा विवाह के. सुरेश (३८) याच्याशी झाला होता. त्यांना दोन मुली (वय ५ आणि ३ वर्षे) आणि ध्रुवन नावाचा पाच महिन्यांचा मुलगा होता. भारतीचा आपल्या मैत्रीण सुमित्रासोबत समलैंगिक (TamilNadu Crime News) संबंध होता. हा संबंध उघड झाल्यानंतर दांपत्यामध्ये वारंवार वाद होऊ लागले. त्यामुळे सुरेशच्या बहिणीला मुलांची जबाबदारी सांभाळावी लागत होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणानंतर भारती माहेरी गेली होती, मात्र नंतर कुटुंबाच्या समजावण्यावरून ती पुन्हा घरी परतली.(TamilNadu Crime News)

घटनेच्या दिवशी सुरेश आणि इतर कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले असताना भारतीने आपल्या पाच महिन्याच्या मुलाचा गळा दाबून खून केला. कुटुंबीय परत आल्यावर तिने मुलाचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाल्याचे सांगितले आणि अंत्यसंस्कार पार पडले. मात्र काही दिवसांनंतर सुरेशला संशय आला आणि त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासात उघड झाले की, भारतीने सुमित्राच्या मदतीनेच मुलाचा खून केला होता. सुमित्राने या खुनाची सगळी योजना आखली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, भारतीने खुनानंतर सुमित्राला फोनवर मेसेज पाठवून गुन्ह्याची कबुली दिली आणि बाळाच्या मृतदेहाचा फोटो पाठवला होता. पोलिसांनी त्यांच्या मोबाईलमधून काही फोटो आणि व्हिडिओ पुरावेही जप्त केले आहेत. दोघींनाही अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

सुरेशने भारतीचा फोन तपासला आणि त्याला फोनमध्ये संशयित फोटो, चॅट आणि व्हॉइस मेसेज आढळले. ते पाहून त्याने ताबडतोब केलामंगलम पोलिसांना कळवले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती गेल्या तीन वर्षांपासून सुमित्रा नावाच्या तरूणीसोबत समलैंगिक प्रेमसंबंधात होती. पण तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या भेटी कमी झाल्या, ज्यामुळे त्यांच्यातील नात्यात तणाव वाढला. या तणावामुळे भारतीने तिच्या 5 महिन्यांच्या मुलाचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे.