Swarnim Vijay Parv : सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे स्मरण करत राजनाथ सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली. भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या 1971 च्या युद्धाला यंदा 50 वर्ष पूर्ण होत आहे. या विजयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त होणारे कार्यक्रम साधेपणाने होणार आहेत. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती दिली. हेलिकॉप्टर दुर्घटनेत भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह लष्करी अधिकाऱ्यांचे निधन झाले होते. तर, ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 


स्वर्णिम विजय दिन 12 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. आज झालेल्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले की, इंडिया गेट येथे भारत-पाकिस्तान युद्धाच्या 'स्वर्णिम विजय वर्षा'च्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला विजय पर्व साजरा करण्यास एकत्रित आलो आहोत. हा दिवस भारतीय लष्कराच्या संस्मरणीय विजयासाठी आहे. भारतीय सैन्याने दक्षिण आशियाचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला. 


या विजय पर्वात देशातील सामान्य जनतेला सहभागी करून घेत असल्याबद्दल त्यांनी म्हटले की, या युद्धातील विजयापासून सामान्य नागरीक प्रेरणा घेतील. 1971 च्या युद्धाबाबत माहिती देण्यासाठी, देशातील सैन्याच्या वाढलेल्या सामर्थ्याची माहिती देण्यासाठी प्रदर्शन आयोजित केले असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha