नवी दिल्ली : केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर किडनी प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. एम्सचे संचालक एम. सी. मिश्रा आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी सुषमा स्वराज यांचं किडनी प्रत्यारोपण केलं.

सकाळी साडे नऊ वाजता सुरू झालेली शस्त्रक्रिया दुपारी अडीच वाजेपर्यंत सुरू होती. सध्या सुषमा स्वराज यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलंय. 64 वर्षांच्या सुषमा स्वराज यांना दिर्घकाळापासून मधुमेह असल्यामुळे त्यांची किडनी निकामी झाली होती.

गेल्या महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर योग्य किडनी दाता मिळाल्यानंतर सुषमा स्वराज यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.

संबंधित बातम्या :

सुषमा स्वराज यांच्यावर आठवड्याअखेर किडनी प्रत्यारोपण?


भारतात येण्यासाठी एक हजार किमीची पायपीट, स्वराज यांची थेट मदत


किडनी फेल, हॉस्पिटलच्या बेडवर, तरीही सुषमा स्वराज कार्यतत्पर


सुषमा स्वराज यांची किडनी निकामी, दिल्लीत उपचार सुरु