Suryanamaskar : 75 कोटी सूर्यनमस्कारांचा विश्वविक्रम करण्याची मोहिम आज हैदराबादमध्ये सुरू होणार आहे. दुपारी साडे चार वाजल्यापासून या मोहिमेचा प्रारंभ होणार आहे. सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय आयुष मंत्री, योग गुरु स्वामी रामदेव हृदयविकारतज्ज्ञ दाजी यांच्या नेतृत्वाअंतर्गत 150 देशांतील लोक या मोहीमेत सहभागी होणार आहेत. 


75 कोटींची सूर्यनमस्कार मोहिम ही भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आजोजित केली आहे.  या मोहिमेत सहभागी होणाऱ्याला 21 दिवस दिवसातून 13 वेळा सूर्यनमस्कार करावे लागणार आहेत. या मोहिमेत अनेक विद्यार्थीदेखील सहभागी होणार आहेत.





 या मोहिमेत 30 राज्य सहभागी होणार आहेत.  30 राज्यांतील 21,814 संस्थांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. तर 10,05,429 विद्यार्थी या मोहिमेत सहभागी होणार आहेत. 


सूर्यनमस्कार कसे करावेत, जाणून घ्या


1) प्रणामआसन : सुरुवातीला सरळ उभं राहावं आणि नमस्कार करावा.


2) हस्तौत्तनासन : मग मागच्या बाजूला वाकावं.


3) हस्तपादासन : त्यानंतर कंबरेतून खाली वाकून दोन्ही हात पायांच्या शेजारी ठेऊन हनुवटी गुडघ्याला लावावी.


4) अश्व संचालनासन : त्यानंतर एक पाय मागे घेऊन, पुढचा पाय गुडघ्यात वाकवून पाठीची कमान करत मागे बघावं.





6) अष्टांग नमस्कार : त्यानंतर दोन्ही हातावर शरीराचा भार घेत, पाठीची कमान करत मान ताठ ठेवावी.





8) पर्वतासन : श्वास सोडत आपली कंबर वरती घ्या.

 

9) अश्व संचालनासन : त्यानंतर एक पाय मागे घेऊन, पुढचा पाय गुडघ्यात वाकवून पाठीची कमान करा





11) हस्तौत्तनासन : मग मागच्या बाजूला वाकावं.

 

12) ताडासन : सरळ उभं राहून नमस्कार करावा. (छायाचित्र सौजन्य : प्रियांका ढोले, आंतरराष्ट्रीय योग शिक्षक आणि आहारतज्ञ)


 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha