सुरक्षा भेदून पंतप्रधान मोदींनी 'बालहट्ट' पुरवला!
एबीपी माझा वेब टीम | 17 Apr 2017 01:04 PM (IST)
सुरत : एका चिमुरडीच्या आग्रहाखातर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षायंत्रणा भेदून तिचा बालहट्ट पूर्ण केला. गुजरातच्या सूरतमध्ये हा प्रकार घडला आहे. सूरतमध्ये एका डेअरी प्रकल्पाची पाहणी करुन पंतप्रधान मोदी पुढच्या कार्यक्रमासाठी जात होते. त्याचवेळी नॅन्सी नावाची चार वर्षांची चिमुकली मोदींच्या सुरक्षा ताफ्याच्या जवळ जाऊन त्यांना भेटण्याचा आग्रह धरु लागली. ही बाब लक्षात आल्यानंतर मोदींनी स्वतः गाडी थांबवायला सांगून तिला जवळ बोलावलं आणि तिच्याशी काही वेळ गप्पाही मारल्या. सूरतमधील एका हिऱ्याच्या कंपनीत काम करणाऱ्या कामगाराची ही मुलगी आहे. मुलीचा भेटण्याचा आग्रह चक्क देशाच्या पंतप्रधानांनी पूर्ण केल्याने तिचे कुटुंबीयही सुखावले आहेत. पाहा व्हिडीओ चिमुकलीच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया