नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने दिल्लीच्या नोयडामधील सुपरटेक एमेराल्ड कोर्ट प्रोजेक्टच्या 40 मजली दोन टॉवर पाडण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे की, नोयडामध्ये सुपरटेक एमराल्ड कोर्टच्या 915 फ्लॅट आणि दुकानदारांनी 40 मजली दोन टॉवर्स नियमांचं उल्लंघन करुन उभारलं होते. या टॉवर्सची निर्मिती नोयडा प्राधिकरणासोबत मिळून केलं आहे. आता सुपरटेकला दोन्ही टॉवर्स पाडावे लागणार आहेत. नोयडा प्राधिकरण याची देखरेख करेल. 




सुप्रीम कोर्टामध्ये सुपरटेकच्या 40 मजली दोन टॉवर्सला नियमांचं उल्लंघन केल्या संबंधीच्या इलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान दिलं होतं.  साल 2014 मध्ये इलाहाबाद हायकोर्टाने दोन्ही टॉवर्स अवैध असल्याचं सांगत पाडण्याचे आदेश दिले होते. या 40-40 मजली दोन टॉवर्समध्ये 950 फ्लॅट्स बनले आहेत. 


या प्रोजेक्टमधून अनेकांनी आपले पैसे परत घेतले आहेत. एमेराल्ड कोर्ट परिसरात राहणाऱ्या लोकांनी आरोप केला होता की,  सुपरटेक बिल्डरनं पैशांच्या लालसेपोटी सोसायटीच्या ओपन एरियामध्ये विना परवानगी हे विशाल टॉवर उभे केले आहेत.