बंगळुरु : बंगळुरुच्या कोरमंगलामध्ये मध्यरात्री एक ऑडी कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात लोकांचा मृत्यू झाला आहे. वेगात असलेली ही कार विजेच्या खांबाला धडकल्याने हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की सहा जणांना जागीच मृत्यू झाला तर एकाचा दवाखान्यात नेत असताना मृत्यू झाला.
या अपघातात होसुरचे डीएमकेचे आमदार वाय प्रकाश यांच्या मुलासह सून आणि अन्य पाच जणांना मृत्यू झाला आहे.
हा अपघात इतका भीषण होता की कारचे अक्षरशा तुकडे झाले. या कारमध्ये सात जण होते. हे सर्व 20 ते 30 वयोगटातील असल्याची माहिती आहे. सर्व मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्यात आलं आहे. या प्रकरणी आडुरुडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार या गाडीचा चालक वेगाने गाडी चालवत होता. हा रस्ता पूर्णपणे रिकामा होता. गाडी वेगात असल्यानं चालकाचं संतुलन बिघडल्याने गाडी विजेच्या खांबाला जोरात धडकली.