नवी दिल्ली: न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणाच्या केसमधून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा  यांनी स्वत:ला दूर केलं आहे.

न्यायमूर्ती लोया यांच्या प्रकरणावर अरुण मिश्रा आणि शांतना गौडर यांच्या खंडपीठात सुनावणी सुरु होती.  काल सुनावणी सुरु असताना अरुण मिश्रा भावूक झाले. आपण आतापर्यंत किती पारदर्शी कारभार केला याबद्दल त्यांनी सांगितलं. त्यानंतर आज अरुण मिश्रा यांनी यातून बाहेर पडण्याचा निर्णय़ जाहीर केला आहे.

याआधी केससच्या वाटपासंदर्भात इतर ४ न्यायाधीशांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या पद्धतीवर आक्षेप घेतला होता. इतिहासात पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली होती.

जय लोयांचा मृत्यू हृदयविकारानेच : नागपूर पोलीस

न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणात अखेर नागपूर पोलिसांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. न्या. लोया यांचा मृत्यू हृदय विकारामुळे झाल्याचं तपासात निष्पन्न झाल्याची माहिती नागपूरचे पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली आहे.

लोया यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांकडे होता. त्यामध्ये हा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचं निष्पन्न झाले असून त्या संदर्भात नागपूर पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे.

 न्या. बी. एच. लोया मृत्यूप्रकरण काय आहे?

नागपुरात 1 डिसेंबर 2014 रोजी जज ब्रिजमोहन हरिकिशन लोया यांचा मृत्यू झाला होता. सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नाला जाताना हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं होतं. मात्र लोया यांच्या बहिणीने त्यांच्या मृत्यू प्रकरणी प्रश्न उपस्थित केले होते. सोहराबुद्दीन केसशी लोया यांचा असलेला संबंध आणि त्यांचा अचानक मृत्यू यावरुन संशय उपस्थित केले गेले.

जज लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका 8 जानेवारी रोजी बॉम्बे लॉयर्स असोसिएशनकडून मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. यावर 23 तारखेला हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

जस्टिस लोया यांचा मृत्यू हृदयविकारानेच : नागपूर पोलीस