नवी दिल्ली : राम जन्मभूमी प्रकरणावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी निकाल देण्याची तयारी दर्शवली आहे. या सुनावणीसाठी लवकरच तारीख निश्चित होणार असल्याचीही माहिती आहे.


2010 सालापासून राम जन्मभूमीचा वाद प्रलंबित आहे. 2010 साली अलाहाबाद उच्च न्यायालयानं या संदर्भात निर्णय दिला होता. मात्र त्यानंतर हा वाद सुप्रीम कोर्टात आला. अजूनही यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

याच वर्षी मार्चमध्ये सुब्रह्मण्यम स्वामी यांनी राम जन्मभूमी प्रकरणी लवकर निकाल द्यावा, असा अर्ज दाखल केला होता. त्यावर सुप्रीम कोर्टानं या निकालावर कोणतीही घाई करता येणार नाही, असं म्हटलं होतं. मात्र आता या प्रकरणी लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.