Pappan Singh Gehlot : कोरोनाकाळात (Corona) शेतात काम करणाऱ्या मजुरांना आपल्या खर्चातून विमानाचं तिकीट खरेदी करून बिहारमध्ये पाठवणारे पप्पन सिंह गहलोत (Pappan Singh Gehlot) यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. 


कोरोनाकाळात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करणं अवघड होतं. त्यादरम्यान पप्पन सिंह गहलोत मजुरांच्या मदतीला धावून आले. पण आता मजुरांच्या मदतीला धावून आलेल्या पप्पन सिंह गहलोतने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 






मदतीला धावून जाणारी व्यक्ती आत्महत्या कशी करू शकते अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आज सायंकाळी दिल्लीतील एका मंदिराजवळ पप्पन सिंह गहलोत यांचा मृतदेह आढळला. मंदिराजवळ गुरुजींनी पप्पन सिंह गहलोत यांना पाहिलं तेव्हा ते एका फांदीला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पप्पन सिंह गहलोत यांचा मृतदेह दिल्लीतील अलीपूर भागातील एका मंदिराच्या फांदीवर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली असून, त्यात त्याने आत्महत्येचे कारण आजारपणाचे सांगितले आहे. 


पप्पन सिंह गहलोत हे दिल्लीतील बख्तावरपूरमधील तिगीपूर गावात मशरूमशी शेती करत होते. दोन वर्षांपूर्वी कोरोनाकाळात मजुरांना मदत केल्याने त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितनेदेखील पप्पन सिंह गहलोतचे कौतुक करत खास पोस्ट शेअर केली होती. 


संबंधित बातम्या


India At 2047: भविष्यातील इस्रोच्या अंतराळ मोहिमा, जाणून घ्या भारत अवकाशात कसे वर्चस्व गाजवेल


24 वर्षांनंतर काँग्रेसची धुरा गांधी घराण्याच्या बाहेर जाणार? दिवाळीआधी पक्षाला मिळू शकतो नवीन अध्यक्ष