नवी दिल्ली : मोदी सरकार बँक खाती, मोबाईल क्रमांक, एलपीजी यांसाठी आधार कार्ड अनिवार्य करत आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे आवश्यक असल्याचं सरकार सांगत आहे. तर दुसरीकडे आधार लिंक करण्याला विरोधही होत आहे. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनीच याला विरोध केला आहे.


पश्चिम बंगाल सरकारने याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारचा हा निर्णय कोणत्याही परिस्थितीत मान्य करणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यातच आता सुब्रमण्यम स्वामी यांनीही हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचं सांगितलं आहे.

https://twitter.com/Swamy39/status/925180131148103680

आधार कार्ड अनिवार्य करणं हा राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. याबाबत लवकरच पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार आहे. सुप्रीम कोर्ट हा निर्णय रद्द करेन, अशी आशाही सुब्रमण्यम स्वामींनी व्यक्त केली आहे.

ममता बॅनर्जी सुप्रीम कोर्टात

मोबाईल क्रमांक 31 मार्च 2018 पर्यंत आधार नंबरने व्हेरीफाईड करायचा आहे. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात पश्चिम बंगाल सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत केंद्राकडून चार आठवड्यांमध्ये उत्तर मागितलं आहे.

माझा मोबाईल क्रमांक बंद केला तरीही चालेल, मात्र आधारशी जोडणार नाही, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता  बॅनर्जी यांनी म्हटलं होतं. ममता बॅनर्जी सुरुवातीपासूनच सरकारच्या या निर्णयाविरोधात आहेत. त्यामुळे त्यांनी सरकारच्या निर्णयाला कोर्टातही आव्हान दिलं आहे.

संबंधित बातम्या :

फोन बंद केला तरीही आधारशी जोडणार नाही : ममता बॅनर्जी


तुमचं बँक खातं आणि आधार लिंक आहे का? असं चेक करा


आधार कार्ड अनिवार्य करण्याची मुदत वाढवली