नवी दिल्ली : सत्तेची चव चाखणाऱ्या काँग्रेसची हिमाचल प्रदेशमध्ये धुळदाण होण्याची चिन्ह आहेत. एबीपी न्यूज, लोकनीति आणि  सीएसटीएसच्या ओपनियन पोलमध्ये भाजपचं कमळ फुलण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


भाजपला 39 ते 45 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला 22 ते 28 जागा मिळण्याचं भाकित वर्तवण्यात आलं आहे. 9 नोव्हेंबरला हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. तर मतमोजणी 18 डिसेंबरला होणार आहे.

दरम्यान, असं असलं तरी प्रत्येक पक्ष हिमाचलमध्ये आपलीच सत्ता येईल असा दावा करत आहे. 1992 पासूनचा इतिहास पाहिला तर हिमाचलमध्ये दरवेळेस सत्ता परिवर्तन होत असल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, जनमत चाचणीनुसार, इथं भाजप सत्ता स्थापन करेल असं दिसतं आहे. मात्र, मतदानाच्या दिवशी सारं काही अवलंबून असणार आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 68 जागा आहेत. 2012 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं 36 जागा मिळवत सत्ता स्थापन केली होती. तर भाजपनं 26 जागांवर विजय मिळवला होता. तर अपक्षांनी 6 जागा मिळवल्या होत्या.



कोणाला किती जागा मिळणार?

भाजप- 39-45

काँग्रेस- 22-28

इतर- 0-3

कोणाला किती मतं मिळतील?

भाजप - 47 टक्के

काँग्रेस- 41 टक्के

इतर - 12 टक्के



मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला पसंती?

प्रेमकुमार धूमल- 31 टक्के

वीरभद्र सिंह- 29 टक्के

सुखविंदर सुक्खू- 7 टक्के

जेपी नड्डा- 5 टक्के

नेमका सर्व्हे कसा झाला?

एबीपी न्यूजने लोकनिती आणि सीएसडीएसच्या मदतीनं हिमाचल प्रदेशमध्ये जनमत चाचणी घेतली. 21 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान हिमाचल प्रदेशच्या 30 विधानसभा मतदारसंघातील लोकांची मतं विचारात घेतली. यावेळी 2815 मतदारांनी आपली मतं नोंदवली.

संबंधित बातम्या :

गुजरातमध्ये भाजपला 118-134 जागा मिळतील : सर्व्हे   

गुजरात सर्व्हे : हार्दिक पटेल काँग्रेससोबत, तरीही भाजप नंबर वन