नवी दिल्ली : देशाच्या तिजोरीला 1 लाख 76 हजार कोटींचा फटका देणाऱ्या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सीबीआयच्या पहिल्या खटल्यात सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत. दिल्लीतील सीबीआय कोर्टाने आज यासंदर्भात निर्णय दिला. हा घोटाळा झालाच नव्हता का, असा सवाल या निर्णयानंतर उपस्थित झाला आहे. देशात यापूर्वीही अनेक मोठे घोटाळे झाले. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांना तुरुंगातही जावं लागलं. अनेक प्रकरणं सध्या प्रलंबित आहेत, ज्यामुळे दिग्गजांवर अटकेची टांगती तलवार आहे. कोळसा घोटाळा यूपीए 2 सरकारच्या कार्यकाळात हा घोटाळा समोर आला. काय झालं होतं ? - कोळसा ब्लॉकच्या लिलावात घोळ करण्यात आला, असा आरोप होता. किती रुपयांचा घोटाळा? – या घोटाळ्याची रक्कम 1 लाख 86 हजार कोटी रुपये एवढी होती आतापर्यंत काय-काय झालं? – 24 सप्टेंबर 2014 ला सुप्रीम कोर्टाने 214 कोळसा खाणींचे परवाने रद्द केले. गेल्या आठवड्यातच झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा आणि कोळसा सचिव एस. गुप्ता यांना 3-3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वाचा : 2007 ते 2017... ‘2G स्पेक्ट्रम’ घोटाळ्यात आतापर्यंत काय काय घडलं? कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा यूपीए 2 सरकारच्या कार्यकाळातच हा देखील घोटाळा समोर आला. काय झालं होतं ? – 2010 साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान मैदानाची निर्मिती करण्यापासून ते सामान खरेदी करण्याच्या सर्व प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होता. किती रुपयांचा घोटाळा? – हा घोटाळा 70 हजार कोटींचा होता. कुणा-कुणावर आरोप? भारतीय ऑलिम्पिक संघाचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्यासह 9 जणांवर आरोप आतापर्यंत काय-काय झालं?- सुरेश कलमाडी सध्या जामिनावर आहेत. तर दिल्लीतील चार अधिकाऱ्यांना प्रत्येकी चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.   ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा यूपीए 2 सरकारच्या कार्यकाळात हा घोटाळा समोर आला. काय झालं होतं?-  2010 साली इटलीची कंपनी फिनमॅक्केनिकाकडून हेलिकॉप्टर खरेदी करताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किती रुपयांचा घोटाळा?-  हेलिकॉप्टर घोटाळा 3600 कोटी रुपयांचा होता कुणा-कुणावर आरोप? – माजी वायूसेना प्रमुख एसपी त्यागी आणि माजी एअर मार्शल ए एस गुजराल यांच्यासह 8 जणांवर आरोप 1,76,000 कोटींच्या ‘2G’ घोटाळ्यावर CBI कोर्टात आज फैसला शारदा चिटफंड घोटाळा पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारमध्ये हा घोटाळा झाला काय झालं होतं?-  पश्चिम बंगालच्या शारदा ग्रुपवर बनावट पद्धतीने जनतेकडून रक्कम जमा केल्याचा आरोप कुणा-कुणावर आरोप?- चिटफंड घोटाळ्यात ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमुल काँग्रेसचे दोन खासदार आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांवरही आरोप किती रुपयांचा घोटाळा? – शारदा चिटफंड घोटाळा 35 हजार कोटी रुपयांचा असल्याचं बोललं जातं व्यापम घोटाळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये 2007 ते 2013  या कार्यकाळात हा घोटाळा झाला. काय झालं होतं?-  मध्य प्रदेशातील अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयात दाखला आणि बेकायदेशीरपणे नोकरी दिल्याचा आरोप आतापर्यंत काय-काय झालं?- सीबीआय चौकशीनंतर 592 जणांविरुद्ध चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे. 2G घोटाळा खटल्यातील निकालावेळी नेमकं काय घडलं? चारा घोटाळा 1996 साली बिहारमधील चारा घोटाळा समोर आला होता. काय झालं होतं?-  दुसऱ्या राज्यातून जनावरांसाठी चारा मागवण्यात आला, मात्र तो केवळ कागदोपत्री होता. किती रुपयांचा घोटाळा? - चारा घोटाळा जवळपास एक हजार कोटी रुपयांचा होता. आतापर्यंत काय-काय झालं? – लालू प्रसाद यादव यांच्यासह 43 आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा सुनावण्यात आली असल्यामुळे लालू सध्या निवडणूक लढवू शकत नाहीत. संबंधित बातम्या :  2G घोटाळा : ए राजा, कनिमोळींसह सर्व आरोपी निर्दोष