स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 15 हजार जागांवर भरती
एबीपी माझा वेब टीम | 05 Apr 2016 10:16 AM (IST)
मुंबई: तरुणांसाठी रोजगाराची चांगली संधी चालून आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अनेक पदं रिक्त असून त्यासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 25 एप्रिलपर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करु शकतात. तब्बल 15 हजार जागांसाठी या भरती प्रकिया करण्यात येणार आहे. - पदाचं नाव: ज्युनिअर असोशिएट एकूण पदसंख्या: 12423 वेतन: 11765-31540 - पदाचं नाव: ज्युनिअर अॅग्रीकल्चर असोशिएट एकूण पदसंख्या: 3008 वेतन: 11765-31540 वयाची अट - 20 ते 28 वर्षापर्यंत पात्रता: पदवीधर निवड प्रकिया: उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि थेट मुलाखत यामधून करण्यात येईल.