वाराणसी: उत्तर प्रदेशमधील वाराणीत जय गुरुदेव बाबांच्या जयंती कार्यक्रमात चेंगराचेंगरीत तब्बल 19 जणांचा मृत्यू झाला असून 12हून अधिक जण जखमी झाले असल्याची माहिती समजते आहे. या घटनेला स्थानिक प्रशासनानंही दुजोरा दिला आहे.


या दुर्घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजारांची मदत देण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना वाराणसीच्या राजघाट पुलावर घडली. जय गुरदेव बाबांच्या कार्यक्रमासाठी हजारो भाविक उपस्थित होते. याचवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 19 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

या घटनेनंतर वाराणसी रेल्वे स्टेशनपर्यंत तब्बल 12 किमी ट्रॅफिक जाम झालं आहे.