नवी दिल्लीः परवानगीपेक्षा जास्त तास विमान उडवून प्रवाशांच्या सुरक्षेचा धोका निर्माण केल्यामुळे स्पाईस जेटच्या 63 वैमानिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. भारतीय नागरी विमान वाहतूक संचलनालयाने ही कारवाई केली आहे. सुरक्षा नियामकाने ठरवून दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त तास विमान उडवण्यात आले.


 

जास्त काळ विमान उडवल्यामुळे वैमानिकाला थकवा येऊ शकतो किंवा डुलकी लागू शकते. त्यामुळे सुरक्षा नियामन मंडळाने काही नियम ठरवून दिलेले आहेत. विमान दुर्घटनांसाठी टाळण्यासाठी सुरक्षा नियामक काम करते.

 

स्पाईसजेटच्या वैमानिकांनी मर्यादेपेक्षा जास्त तास विमान उड्डाण केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे यात दोषी असणाऱ्या 63 वैमानिकांना 15 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं असून घटनेची पुनरावृत्ती टाळण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, असं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री जयंत सिन्हा यांनी लोकसभेत सांगितलं.