मुंबई : स्पॅम कॉल आपल्याला नवीन नाहीत. दिवसातून एकतरी स्पॅम कॉल आपल्याला येत असतो. 'Truecaller'ने आता त्यांचा इनसाईड रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टमध्ये जगभरातील टॉप 20 देशांची यादी तयार केली आहे, जे देश स्पॅम कॉलमुळे सर्वाधिक त्रस्त आहेत. या यादीत भारताचं नाव देखील सामील आहे.


ब्राझीलमध्ये सर्वाधिक स्पॅम कॉल्स


ट्रूकॉलर (Truecaller)च्या या रिपोर्टनुसार, ब्राझीलमधील युजर्स स्पॅमकॉलने सर्वाधिक त्रस्त आहेत. भारत या यादीत नवव्या स्थानी आहे. भारताचं स्थान या यादीत घसरलं आहे, याचं मोठं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय ग्राहकांना येणाऱ्या स्पॅम कॉलमध्ये 34 टक्के घसरण झाली आहे.


स्पॅम कॉल कमी का झाले?


ट्रुकॉलरच्या रिपोर्टनुसार, भारतात 98.5 टक्के स्पॅम कॉलसाठी डोमेस्टिक नंबर्सचा वापर केला जातो. काही महिन्यांपूर्वी देशात देशव्यापी लॉकडाऊनची स्थिती होती. त्यामुळे टेलिमार्केटिंगमध्ये काम करणारे कर्मचारी कामावर जाऊ शकले नाहीत. त्यामुळे स्पॅम कॉल येणं काहीसं बंद झालं होतं. त्यामुळे स्पॅम कॉलच्या टक्केवारीत भारतात घट झाली आहे.


राज्यनिहाय स्पॅम कॉल्सची टक्केवारी


महाराष्ट्र - 13.2 टक्के
आंध्र प्रदेश - 9.5 टक्के
उत्तर प्रदेश - 9.5 टक्के
दिल्ली - 7.5 टक्के
कर्नाटक - 7.1 टक्के
मध्य प्रदेश - 6.3 टक्के
राजस्थान- 5.9 टक्के
तमिलनाडू - 5.2 टक्के
बिहार - 4.4 टक्के
केरल - 4.4 टक्के
पंजाब - 3.6 टक्के
हरियाणा - 2.5 टक्के
कोलकाता - 2.5 टक्के
ओडिशा - 2.0 टक्के
वेस्ट बंगाल - 1.9 टक्के
आसाम - 0.8 टक्के
हिमाचल प्रदेश - 0.6 टक्के
जम्मू & कश्मीर- 0.4 टक्के