Congress Committee Meeting : काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात रविवारी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. पाच राज्यात झालेल्या दारुण पराभवानंतर या बैठकीत चिंतन करण्यात आले. तसेच पक्षाच्या पुढील वाटचालीचीही चर्चा झाली. या बैठिकाला राहुल गांधी ऐआणि प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. याशिवाय छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेष बघेल, राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, हरीश रावत, राजीव शुल्का, प्रमोद तिवारी, अधीर रंजन चौधरी, देवेंद्र यादव आनंद शर्मा, दिग्विजय सिंह, अजय माकन आणि गुलाम नबी आज़ाद या नेत्यांचाही समावेश होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत सोनिया गांधी यांनी पक्ष संगठणेच्या हितासाठी जे करावे लागेल, ते सर्व करेन. गरज पडल्यास मी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी राजीनामा देईल, असे सांगितले. पण काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठकीत जवळपास सर्वच नेत्यांनी सोनिया गांधी यांनी आपल्या पदावर कायम राहावे, अशी भूमिका घेतली. 


उत्तर प्रदेश , उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभव स्वीकारावा लागला. पंजाबसारखं मोठं राज्यही काँग्रेसच्या हातून गेलं, तर गोव्यामध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रचार केला. पण त्या राज्यामध्ये पक्षाला केवळ दोन जागा मिळाल्या, त्यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी आणि रायबरेली या ठिकाणीही काँग्रेसला पक्षाचे उमेदवार निवडून आणता आले नाहीत. या कामगिरीनंतर पुढील रणनितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित ककरण्यात आली होती. बैठकीनंतर राजीव शुल्का यांनी सांगितलं की, काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी याच राहणार आहेत. सर्वांनी याला दुजोरा दिला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘काही लोकांच्या मते पराभवाला गांधी कुटुंबचं जबाबदार असल्याचे काही लोकांना वाटतेय. जर तुम्हा सर्वांना असेच वाटतेय तर पक्ष संगठणेसाठी आम्ही काहीही करायला तयार आहे. वेळ पडल्यास राजीनामाही देऊ. ’






काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी याच राहणार आहेत. सोनिया गांधी याच काँग्रेसचं नेतृत्व करतील आणि भविष्यातील निर्णय घेतील, असं मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले आहे. सर्वांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे खर्गे म्हणाले. पाच राज्यांमधल्या पराभवानंतर रविवारी काँग्रेसची बैठक झाली. पाच राज्यात झालेल्या पराभवावर या बैठकीत चिंतन करण्यात आलं. राहुल गांधी यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं मतही काहींनी बैठकीत मांडलं. यावर आता लवकरच पक्षांतर्गत मतदान घेण्यात घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.