या प्रकरणी आमदार शरद चौहान यांच्यासह नरेला पोलीस ठाण्याशी संबंधित माजी आयओ यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. सोनीच्या आत्महत्येच्या काही दिवस आधी शरद चौहान यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ५०६ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला होते. तसेच महिलेने एक व्हिडीओ प्रसिद्ध करून भारद्वाजवर गंभीर आरोप लावले होते.
दरम्यान ,या अटक प्रकरणानंतर आप नेते आशुतोष यांनी ट्विटरवरून या प्रकरणी मोदी सरकारला दोष दिला आहे. आशुतोष यांनी आपल्या ट्विटमध्ये, ''आणखी एक आप आमदाराल अटक, मोदी वेडे झाले आहेत का? कि त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे? जर पंतप्रधान नरेंद्र मोदी राग आणि द्वेषाने काम करणार असतील, तर देश सुरक्षित कसा राहिल?'' असा प्रश्न उपस्थित केला आहे.