बौद्ध धर्म न स्विकारण्याच्या आठवलेंच्या वक्तव्यावर मायावतींनी प्रेस रिलीज काढून आठवलेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. ''बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात लोकांना जागरुक करण्याचे, तसेच शेवटच्या क्षणीही आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्विकारला. यासाठी त्यांनी गडबड केली नाही. काशीराम यांनीही असेच केले होते. मीही जेव्हा बौद्ध धर्माचा स्विकार करेन, तेव्हा समाज जागरुक असला पाहिजे. कारण या ऐतिहासिक घटनावेळी माझ्यासोबत कोट्यवधी लोंकांनाही बौद्ध धर्माची दिक्षा घ्यावी वाटेल.''
पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या या पत्रकामध्ये ''उत्तर प्रदेशमध्ये शोषित, पीडित, दलित व इतर मागासवर्गातील नागरिक डॉ. आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी मोठा संघर्ष करत आहे. पण रामदास आठवलेंसारखे गुलामगिरीत जगणारे लोक भाजपच्या हातातील बाहुले बनुन दलितांच्या एकजुटतेला खंडित करत आहेत.''