SN Shukla Ex-Judge of Allahabad HC : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे (Allahabad High Court) निवृत्त न्यायमूर्ती एस.एन शुक्ला (SN Shukla) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या निवृत्त न्यायाधीशांवरच भ्रष्टाचाराचा आरोप (Corruption Case) आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एस. एन. शुक्ला यांच्याकडे काळा पैसा असल्याचं सीबीआय तपासात उघड झालं आहे. शुक्ला यांच्यावर बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी सीबीआय (CBI) कडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्ला यांच्यावर याआधीही भष्ट्राचाराचे आरोप लागले होते.
बेहिशेबी मालमत्ता जमवल्या प्रकरणी गुन्हा
केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश नारायण शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपावरून नवीन गुन्हा दाखल केला आहे. 2014 आणि 2019 दरम्यान 2.5 कोटीची बेहिशेबी मालमत्ता जमवल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयच्या तपासात असे आढळून आले की, न्यायमूर्ती शुक्ला यांनी काळा पैसा दोन ट्रस्ट, एक फाउंडेशन आणि रिअल इस्टेट कंपन्यांच्या माध्यमातून सफेद केला होता.
कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड
निवृत्त न्यायमूर्ती शुक्ला यांच्याकडे अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी मालमत्ता असल्याचे अनेक पुरावे सीबीआयच्या हाती लागले आहेत. निवृत्त न्यायामूर्ती शुक्ला यांनी 1 एप्रिल 2014 ते 6 डिसेंबर 2019 या कालावधीत 4.07 कोटी रुपयांची संपत्ती कमावली आणि खर्च केली. दरम्यान, या कालावधीत शुक्ला यांचे उत्पन्नाच्या एकूण उत्पन्न फक्त 1.53 कोटी रुपये होते. त्यामुळे शुक्ला यांच्याकडेल कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचं सीबीआय तपासात उघड झालं आहे.
पत्नींच्या नावावर कमावला काळा पैसा
सीबीआयने बुधवारी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, "अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती एस.एन. शुक्ला यांनी सैदीन तिवारी (शुक्ला यांची पहिली पत्नी) आणि सुचिता तिवारी (शुक्ला यांची दुसरी पत्नी, सुचिता तिवारीचा सीबीआय न्यायालयात दावा) यांच्या नावाखाली अवैधरित्या भरपूर पैसा कमावला.
सीबीआयने सांगितलं की, एस.एन. शुक्ला यांच्या घरी आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या लखनौच्या गोल्फ सिटी भागातील निवासस्थानी तसेच अमेठीतील त्यांच्या मेहुण्याच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली. या तपासादरम्यान, शुक्ला यांच्या मोबाईल फोनचा डेटा काढण्यात आला. यामध्ये शुक्ला यांचे सुचिता तिवारीशी संबंध असल्याचं उघड झालं. माजी न्यायमूर्तीं शुक्ला यांनी पहिली पत्नी सैदीन यांच्या नावावरही मालमत्ता घेतल्याचं समोर आलं आहे. शुक्ला यांच्यावर भ्रष्टाचाराचा हा दुसरा आरोप आहे. 2021 मध्ये, लखनौच्या प्रसाद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS) शी संबंधित न्यायालयीन भ्रष्टाचाराच्या तपासात शुक्ला यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Menstrual Leave : महिलांना मासिक पाळीच्या काळात सुट्टीची मागणी, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली