भारतीय सैन्य दलाच्या शौर्यगाथेला व्हिडिओमधून अभिवाद
एबीपी माझा वेब टीम | 11 Aug 2016 04:34 PM (IST)
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भारतीय सैन्य दलाच्या शौर्यगाथेला अभिवादन करणारा संरक्षण मंत्रालयाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या वतीने प्रसारीत करण्यात आलेल्या या व्हिडिओमधील गीताचे 'तिरंगा जान है...' असे बोल आहेत. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी झालेल्या सैन्य दलाच्या विविध प्रात्यक्षिकांसोबतच, शस्त्रास्त्रांचे शक्तीप्रदर्शनही दाखवण्यात आले आहे. यासोबतच मोदी सरकारचे विविध योजनांचे आणि धोरणांचे यश, याशिवाय तिन्ही दलांच्या धाडसी कार्याचाही आलेख मांडण्यात आला आहे. स्मृती इराणी 18 ऑगस्ट रोजी सियाचीन दौऱ्यावर जात असून, या दौऱ्यावेळी त्या सियाचीनमधील सरंक्षणासाठी तैनात जवानांना रक्षा सूत्र बांधणार आहेत. स्मृतीने ईराणींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून जवानांना कृतज्ञता व्यक्त केली आहे.