श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात केरन सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. हे दहशतवादी घुसखोरी करुन भारताच्या हद्दीत आले होते. दरम्यान या परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता आहे.


संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता कर्नल राजेश कालिया यांनी अधिकृतपणे याची माहिती दिली आहे. आज रविवारी सकाळी केरन सेक्टरमध्ये दहशतवादी  घुसखोरी करणार असल्याची माहिती भारतीय सैन्याला मिळाली होती. त्यामुळे धडक कारवाई करत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव हाणून पाडत सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला.

मागच्या एका आठवड्यात केरन सेक्टरमध्ये घुसखोरीची ही तिसरी घटना आहे. नुकताच केरन सेक्टरमधील घुसखोरीचा डाव हाणून पाडताना दोन जवानही गंभीर जखमी झाले होते, यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

यावर्षी 1000 हून अधिकवेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन

यावर्षी पाकिस्तानने 1000 हून अधिकवेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.