लखनऊ:  उत्तर प्रदेशातील सितापूर इथं रोड शो दरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर बूट भिरकावण्यात आला. राहुल गांधींना हा बूट लागला नाही.


याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

राहुल गांधी रोड शो द्वारे सरकारवर हल्ला चढवत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी राहुल गांधींनी केली आहे. या रोड शोला काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. राहुल गांधी उघड्या जीपमध्ये होते. त्यावेळी मागून एका व्यक्तीने राहुल गांधींच्या दिशेने बूट फेकून मारला.