Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणारा कॉमेडियन श्याम रंगीलाचा (Shyam Rangeela)  उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. श्याम रंगीला याने मंगळवारी अर्ज भरला होता. त्यानंतर आज त्याचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. राजकारण आपलं क्षेत्र नाही, कॉमेडी करणं हेच आपलं काम असल्याची भावुक प्रतिक्रिया श्याम रंगीला यांनी दिली. 


कॉमेडियन श्याम रंगीला याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. पण त्याचा अर्ज बाद ठरवण्यात आला. देशातील लोकशाही किती धोक्यात आहे हे सांगण्यासाठी आपण लोकसभेसाठी अर्ज भरला असल्याचं श्याम रंगीलाने सांगितलं होतं. मात्र अर्ज बाद ठरवण्यात आल्यानंतर तो नाराज झाल्याचं दिसून आलं. 


 






फॉर्म का नाकारण्यात आला?


वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर श्याम रंगीलाच्या अर्जाची बुधवारी छानणी करण्यात आली. त्यानंतर त्याचा अर्ज बाद ठरवण्यात आला. त्यानंतर श्याम रंगीलाने एबीपी लाईव्हशी संवाद साधताना सांगितलं की, कठोर परिश्रम आणि अडचणींचा सामना केल्यानंतर मी 14 मे रोजी वाराणसी लोकसभा जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सर्व पेपर्स आणि आवश्यक गोष्टी लक्षात घेऊन आम्ही अर्ज भरला होता. मात्र उमेदवारी अर्ज भरताना घेतलेल्या शपथेती पूर्तता आपल्याकडून झाली नसल्याचं सांगत आपला अर्ज बाद करण्यात आला. 


कदाचित मला गंगा मातेचा आशीर्वाद मिळाला नसेल, त्यामुळेच आपला अर्ज बाद झाल्याचं श्याम रंगीला याने सांगितलं. त्याचवेळी वाराणसी जिल्हा प्रशासनावर नामांकन प्रक्रियेत गोंधळ घातल्याचा आरोप त्याने केला.  


वाराणसीमध्ये  जूनला मतदान


उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर श्याम रंगीला वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवू शकणार नाही. श्याम रंगीला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. वाराणसी लोकसभा जागेसाठी सातव्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे. या जागेवर पीएम मोदी भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवार आहेत. तर इंडिया अलायन्सने अजय राय यांना या जागेवर उमेदवारी दिली आहे. या जागेवर बसपकडून अतहर जमाल लारी हे उमेदवार आहेत.


ही बातमी वाचा: