Shraddha murder case  : श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला (Aftab Poonawala)याला पॉलीग्राफ चाचणीनंतर घेऊन निघालेल्या पोलिस वाहनावर दिल्लीतील रोहिणी येथे हल्ला करण्यात आला. पॉलीग्राफ चाचणीनंतर एफएसएल टीम आफताबला घेऊन बाहेर आली. त्यानंतर जमावाने घटनास्थळ गाठून वाहनावर हल्ला केला. विशेष म्हणजे यावेळी या लोकांच्या हातात तलवारी होत्या. या जमावातील लोकं ते आफताबला मारुन टाकण्याबाबत बोलत होते. जेव्हा हल्ला झाला तेव्हा एक पोलिस व्हॅनमधून बाहेर आला आणि त्याने या लोकांवर बंदूक रोखली. त्यावेळी जमाव मागे हटला.


यावेळी संतप्त जमावाने पोलिस व्हॅनवरही दगडफेक केली. ज्या व्यक्तिनं हल्ला केला तो यावेळी म्हणाला की, त्याला दोन मिनिटांसाठी बाहेर काढा, मारून टाकू. दरम्यान आफताबला घेऊन जाणाऱ्या गाडीवर हल्ला करणाऱ्या काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्लेखोर हिंदू सेनेचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला आहे.


पोलिस व्हॅनमध्ये 5 पोलिस  


रोहिणी डीसीपी गुरिकबाल सिंग यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, आफताबला घेऊन जाणाऱ्या गाडीवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशी सुरू असून यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेत आहोत. ते ज्या संस्थेचे नाव घेत आहेत त्यांचीही माहिती गोळा केली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहातून कैद्यांना नेण्याची जबाबदारी दिल्ली पोलिसांच्या एका बटालियनकडे आहे. आफताबसोबत पोलिस व्हॅनमध्ये एका उपनिरीक्षकासह 5 पोलिस आणि चार पोलिस होते. 


आफताबच्या पॉलीग्राफ चाचणीनंतर झाला हल्ला


आफताबची रोहिणीच्या एफएसएलमध्ये पॉलीग्राफ चाचणी सुरू होती. त्यानंतर पोलिसांचे पथक त्याच्यासोबत परत जात होते. दरम्यान, काही लोकांनी पोलिस व्हॅनवर हल्ला केला. आवश्यकता भासल्यास उद्या आफताबलाही या चाचणीसाठी बोलावण्यात येणार आहे. पॉलीग्राफ चाचणी संपल्यानंतर नार्को चाचणी सुरू केली जाणार आहे.


आरोपी न्यायालयीन कोठडीत  


आफताबवर त्याची गर्लफ्रेंड श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धाच्या शरीराचे अवयव त्याच्या मेहरौली येथील घरी फ्रीजमध्ये ठेवले होते आणि नंतर अनेक दिवस ते शहरभर फेकून दिले होते.  


ही बातमी देखील वाचा


Shraddha Murder Case : आफताबने सिगारेटचे चटके दिले होते, तरीही श्रद्धाने त्याला दिली होती एक संधी