श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपिंया भागात काल एका दहशतवाद्याला कंठस्नान घातल्यानंतर, आज एक जिवंत दहशतवादी भारतीय सैन्याच्या हाती लागला आहे. रात्रीपासून सुरु असलेल्या चकमकीनंतर आज या दहशतवाद्यानं भारतीय सैन्यापुढे आत्मसमर्पण केलं.
शोपिंयातल्या बारबग भागात कालपासून दहशतवादी लपून बसले होते. जवानांना माहिती मिळताच या भागाला चारही बाजूंनी घेरण्यात आलं. यावेळी एका साथीदाराच्या खात्म्यानंतर दुसऱ्या दहशतवाद्यानं शस्त्र खाली टाकत आत्मसमर्पणाचा मार्ग पत्करला.
गेल्या काही महिन्यातली काश्मीरमधील दहशतवाद्यांसोबतच्या चकमकी आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्याला आत्मसमर्पण करायला लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्याचं नाव आदिल असल्याची माहिती आहे.
आदिल हा शोपिंयाच्या चिपीपोराचा रहिवासी असून, त्याला चौकशीसाठी घटनास्थळापासून इतरत्र नेण्यात आलं आहे. तसेच त्याच्याकडून यावेळी एके 47 रायफलही जप्त करण्याची आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे काल दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर केलेल्या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला असून इतर दोन जण जखमी झाले आहेत.
आज होणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या बैठकीच्या ठिकाणापासून काही अंतरावरील बस स्थानकात हा हल्ला घडवून आणण्यात आला.
जम्मू-काश्मीरच्या शोपिंयातल्या चकमकीत जिवंत दहशतवादी लष्कराच्या हाती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Sep 2017 12:29 PM (IST)
जम्मू-काश्मीरच्या शोपिंया भागात काल एका दहशतवाद्याला कंठस्नान घातल्यानंतर, आज एक जिवंत दहशतवादी भारतीय सैन्याच्या हाती लागला आहे. रात्रीपासून सुरु असलेल्या चकमकीनंतर आज या दहशतवाद्यानं भारतीय सैन्यापुढे आत्मसमर्पण केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -