शवविच्छेदन अहवालानुसार प्रद्युम्नच्या गळ्यावर करण्यात आलेला पहिला वार 18 सेंमी लांब आणि 2 सेंमी रुंद आहे. तर दुसरा वार 12 सेंमी लांब आणि 2 सेंमी खोल आहे. हे वार इतके भयंकर होते की, प्रद्युमनच्या गळ्याच्या पेशी, श्वासनलिका, अन्ननलिका आणि कान यांना देखील भीषण जखमा झाल्या होत्या.
गुरुग्राममध्ये 8 सप्टेंबरला सकाळी सात वर्षांच्या प्रद्युम्न ठाकूर या मुलाची शाळेच्याच बस कंडक्टरने गळा चिरुन हत्या केली. हत्येपूर्वी बस कंडक्टरने प्रद्युम्नच्या लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला होता. आरोपी कंडक्टर अशोक कुमारने हत्येची कबुली दिली आहे. परंतु या प्रकरणाचा अद्याप उलगडा झालेला नाही.
शाळेची भूमिका संशयास्पद
मात्र या संपूर्ण प्रकरणात रायन इंटरनॅशनल स्कूलची भूमिका मोठी संशयास्पद आहे. प्रद्युम्न हत्या प्रकरणाच्या तपासासाठी तपास यंत्रणा मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. उत्तर विभागात रायन इंटरनॅशलनच्या 23 शाळा आहेत. त्यापैकी दिल्ली एनसीआरमधील 11 शाळांचा समावेश आहे.
पोलिसांवरही कारवाई
या प्रकरणात पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. रायन इंटरनॅशनल स्कूल ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत येतं, त्याच्या पोलिस इन-चार्जचं निलंबन केलं आहे. पालक आणि मीडियावर लाठीचार्ज केल्याने ही कारवाई केली आहे.
संबंधित बातम्या :
लैंगिक शोषणानंतर 7 वर्षांच्या मुलाची गळा चिरुन हत्या, बस...
प्रद्युम्न हत्या : वडिलांची याचिका, सुप्रीम कोर्टाची हरियाणा सरकार, शाळेला नोटीस