मुंबई : साध्वींवरील बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा झालेल्या बाबा राम रहीम विरोधात आज दोन हत्येप्रकरणी पंचकुलाच्या विशेष सीबीआय कोर्टात सुनावणी होणार आहे.
बाबा राम रहीमच्या कारनाम्यांविरोधात सर्वप्रथम आवाज उठवणारे पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि डेरा सच्चा सौदाचे माजी व्यवस्थापक रणजीत सिंह यांच्या हत्येचा आरोप बाबा राम रहीमवर आहे.
या दोघांच्या हत्येप्रकरणी आज विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी होणार आहे. पंचकुला येथे बाबा अनुयायांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.