मुंबई:  नोटाबंदीच्या निर्णयावर पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेचा माध्यमांनी विपर्यास केल्याचा दावा शिवसेनेनं एका पत्रकाद्वारे केला आहे.

नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर व्यक्त करत, या निर्णयात शिवसेनेची साथ हवी असल्याचं वक्तव्य केल्याचं स्पष्टीकरण, शिवसेनेचे गटनेते आणि खासदार आनंदराव अडसूळ यांनी केलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला झापलं, खडसावलं या बातम्या चुकीच्या असल्याचाही त्यांनी दावा केला.



"आप को कैसे छोड सकते है हम, आप क्या जवाब देंगे मालूम नहीं, लेकीन मैं जब उपर जाऊंगा, तो बालासाहब को क्या जवाब दूंगा?' असे भावोद्गार काढल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.

मात्र माध्यमांनी चुकीची बातमी देत मोदींनी शिवसेनेला खडसावलं असं वृत्त दिलं, ते साफ खोडं असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

याशिवाय जिल्हा बँकांसाठी २१ हजार कोटी रु देण्याचा निर्णय झाला हा निव्वळ आणि निव्वळ शिवसेनेच्या पाठपुराव्याचा, उद्धव ठाकरे यांचा विजय आहे, असा दावाही सेनेने केला.

संबंधित बातम्या


वर जाऊन बाळासाहेबांना उत्तर देईन, मोदींनी शिवसेनेला सुनावलं