नवी दिल्ली: शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानबंदी अद्यापही कायम आहे. याप्रकरणी शिवसेना खासदारांनी एअर इंडिया आणि विमान कंपन्यांवर हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. मात्र, या संपूर्ण प्रकारावर सरकारनं दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे या प्रकरणावर आज शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी लोकसभेत आवाज उठवला. रवींद्र गायकवाड यांच्या प्रश्नासंबंधी आज आनंदराव अडसूळ यांनी सरकारला इशारा दिला. 'आम्हीपण हंगामा करू शकतो, त्यामुळे या प्रकरणाकडे तातडीनं लक्ष द्यावं.' असं म्हणत आनंदराव अडसूळ यांनी आपला संताप व्यक्त केला. शिवसेनेनं मांडलेल्या हक्कभंग प्रस्तावाकडे आतापर्यंत दुर्लक्ष करण्यात आल्यानं सेना खासदार आता आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणी शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं आहे. “एअर इंडियाने खासदारांवर गुन्हा दाखल केला. पण सर्वच विमान कंपन्यांनी बंदी घालणे चुकीचे आहे. संविधानानुसार कुठेही प्रवास करता येतो. बंदी घालणे हे आपल्या हक्कापासून वंचित करणे आहे. माझी अपेक्षा आहे की, सर्व खासदार सहकार्य करतील. अध्यक्षांनी सरकारला निर्देश द्यावे, कपिल शर्मा यांनी मारहाण केली परंतु त्यावर चौकशी सुरु आहे. नागरी उड्डाणमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. विमान कंपन्यांनी बंदी उठवावी”, असं म्हणत अडसूळ यांनी विमान कंपन्यांविरोधात हक्कभंग दाखल केला होता. काय आहे प्रकरण? उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. बिझनेस क्लासचं तिकीट असताना आपल्याला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं, असा दावा गायकवाड यांनी केला. रवींद्र गायकवाड त्याची तक्रार दिल्लीत गेल्यावर करणार होते. दिल्लीत विमान पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार पुस्तिका मागवली, पण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला, असा दावा गायकवाड यांनी केला. विमानातून सर्व कर्मचारी उतरुन गेल्यानंतरही रवींद्र गायकवाड बसून राहिले. तक्रार करण्याचा त्यांचा हट्ट होता. त्यानतंर क्रू मेंबरने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बोलावलं. मात्र त्या कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली, असं रवींद्र गायकवाड यांचं म्हणणं आहे. ‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही,  मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो,  अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली. भारतीय विमान संघाची बंदी भारतीय विमान संघानं गायकवाडांवर बंदी घातली आहे. जवळपास भारतातील सर्व विमान कंपन्यांनी गायकवाडांवर बंदी घातली आहे. भारतीय विमान संघामध्ये गोएअर, जेट एअरवेज, जेटलाईट, इंडिगो यासारख्या प्रमुख विमान कंपन्यांचा समावेश आहे. कोण आहेत रवींद्र गायकवाड?– रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत– लोकसभा निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला.– उस्मानाबाद आणि परिसरात रवी सर म्हणून ते परिचित आहेत– रवींद्र गायकवाड हे उमरगा मतदारसंघातून दोन वेळ विधानसभेवर निवडून गेले होते.– दुष्काळी भागात पाझर तलावासाठी त्यांनी काम केलं आहे.– तसंच उस्मानाबाद परिसरातील वीजेच्या प्रश्नासाठीही आवाज उठवला.

संबंधित बातम्या :

VIDEO: खा. रवींद्र गायकवाडांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैदताई म्हणून सांगते, विमानबंदी प्रश्नी सलोख्याने तोडगा काढा : महाजनप्रत्यक्षदर्शी एअर होस्टेस खासदार रवींद्र गायकवाड यांच्या बाजूनेमीडियाशी बोलू नका, उद्धव ठाकरेंकडून खा. गायकवाड यांना समजरवींद्र गायकवाड उस्मानाबादला आलेच नाहीत, ‘ते’ दोघेही…कपिल शर्मावर बंदी नाही, मग खा. गायकवाडांवर का?: खा. अडसूळखा. रवींद्र गायकवाड गायबच, शिवसैनिकांची उस्मानाबाद बंदची हाकखा. रवींद्र गायकवाड यांचं लेखी स्पष्टीकरणगायकवाडांना सेवा नाकारणाऱ्या एअरलाईन्सविरोधात हक्कभंग आणणारलोकप्रतिनिधींनी पटकन हिंसक होणं अयोग्य : एकनाथ शिंदेपुन्हा त्याच विमानाने जाणार, एअर इंडियाने अडवून दाखवावं : गायकवाडएअर इंडियाकडून खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात तक्रार… म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाडशिवसेनेने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याचा पुतळा जाळला