नवी दिल्ली: शिवसेनेच्या नेत्यांच्या शिष्टमंडळान दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी राजनाथ सिंह यांच्याकडे केली.


या बैठकीला परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, श्रीरंग बारणे आणि आनंदराव अडसूळ उपस्थित होते. दरम्यान, मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस, चर्नी रोड आणि एल्फिन्स्टन या रेल्वे स्थानकांची नाव बदलण्याची मागणीही शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेच्या शिष्टमंडळानं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अर्थमंत्री अरुण जेटली आणि कृषीमंत्री राधामोहन सिंह यांचीही भेट घेतली होती. मात्र, त्यावेळी दोन्ही नेत्यांकडून कोणतंही ठोस आश्वासन देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्राच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून ठोस आश्वासन नाही