पणजी : गोव्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना गोव्याचे माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांच्यासोबत जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सुभाष वेलिंगकर यांनी योग्य प्रस्ताव दिल्यास गोव्यात युती करण्याची तयारी शिवसेनेने दर्शवली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी हा विचार बोलून दाखवला.


येत्या वर्षात गोव्यामध्ये विधासभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर गोव्यात संघामध्ये फूट पडली आणि सुभाष वेलिंगकर यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.भाजपला कोंडीत पकडण्याची ही संधी समजून आता शिवसेनाही वेलिंगकरांच्या मदतीला आली आहे.

संजय राऊतांच्या उपस्थितीत सुभाष वेलिंगकरांची पणजीत बैठक


सुभाष वेलिंगकर यांनी मातृभाषेसंदर्भात भूमिका घेतली आहे. या विचारांशी निष्ठा राखणारे समविचारी पक्ष किंवा संघटना एकत्र आल्या आणि युती झाली तर ती गोव्याच्या जनतेच्या परिवर्तनासाठी फायद्याची ठरेल. वेलिंगकर यांनी पुढाकार घ्यावा, नेतृत्व करावं. हा विषय राजकारणाचा नाही तर सांस्कृतिक रक्षणाचा आहे. जर वेलिंगकरांनी अशी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला, तर प्रसंगी आम्ही दोन पावलं मागे येऊ आणि वेलिंगकरांसोबत युती करु," अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे.

पर्रिकरांनी संघाचा विश्वासघात केला : सुभाष वेलिंगकर


दरम्यान, गोव्यात सुभाष वेलिंगकर आणि संजय राऊत यांच्यात रविवारी झालेल्या बैठकीत सुमारे दोन तास चर्चा झाली.  संजय राऊत यांच्यावर पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. त्यादृष्टीने पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी शिवसेनेने आतापासूनच संघातल्या आणि भाजपमधल्या नाराज गटाला आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तर गोव्यात वेलिंगकर यांनी आरएसएसमधून बाहेर पडत गोवा प्रांताचा स्वतंत्र संघ स्थापन केला आहे.