केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांची 158 जणांविरुद्ध गैरवर्तनाची तक्रार
एबीपी माझा वेब टीम | 12 Sep 2016 10:10 AM (IST)
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी 158 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये रविवारी दुपारी एका रोड शो दरम्यान हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. 'अपना दल'च्या नेत्या आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल रोड शोसाठी प्रतापगडला गेल्या होत्या. त्यावेळी समाजवादी पक्षाचे स्थानिक नेते विनोद दुबे आणि त्यांच्या 157 कार्यकर्त्यांनी आपल्याशी आणि अपना दलच्या कार्यकर्त्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. राणीगंज पोलिस स्टेशनमध्ये 158 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आपल्या पक्षाच्या रोड शोमध्ये अडथळा आणण्यासाठी हा कट रचल्याचा आरोप पटेल यांनी केला आहे.