Shiv Sena in UP Elections : 2022 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांबाबत (UP Assembly Elections) उत्सुकता वाढणार आहे. AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी उत्तर प्रदेश निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर आता शिवसेनेनंही उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुक 2021 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व 403 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. अद्याप या निवडणूकीत शिवसेना युती करणार का? आणि  कोणासोबत युती करणार? हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही. 


पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपासून होणाऱ्या निवडणुकांपूर्वी शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे की, शिवसेना उत्तर प्रदेशातील सर्व 403 जागांवर निवडणूक लढवणार आहे. शिवसेनेचा हा निर्णय निवडणुकीत भाजपसाठी अडचणी वाढवू शकतो.



आगामी काळात राजकीय युती होण्याची शक्यता 


उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी युतीबाबत बोलायचं झालं तर, शिवसेनेनं आतापर्यंत कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी केलेली नाही. परंतु, या सर्व घडामोडींमध्ये एकाच गोष्टीचे संकेत नक्कीच मिळत आहेत की, येणाऱ्या काही दिवसांत शिवसेना युतीसह निवडणूक रिंगणात उतरू शकते.


भाजपवर शिवसेनेचा निशाणा 


उत्तर प्रदेशच्या सर्व विधानसभा जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीत शिवसेना नेत्यांनी आरोप लावलाय की, भाजप सरकारच्या काळात उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. राज्यात बहिणी, मुली कोणीही सुरक्षित नाही. तर जनता बेरोजगारी आणि महागाईनं त्रस्त आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :