Sheena Bora Murder Case : शीना बोरा हत्या प्रकरणी (Sheena Bora Murder Case) इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukerjea) हिला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. तब्बल साडेसहा वर्षांनी इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. इंद्राणी मुखर्जीसोबतच तिचा दुसरा पती पीटर मुखर्जीही या प्रकरणात अटकेत होता. काही दिवसांपूर्वीच पीटर मुखर्जीला जामीन मंजूर झाला आहे. आपली सावत्र मुलगी शीना बोरा हिच्या हत्याकांडात सामिल असल्याच्या आरोपाखाली पीटरला अटक करण्यात आली होती. दरम्यान, 2012 साली अलिबागच्या जंगल परिसरात शीना बोराचा मृतदेह सापडला होता. मात्र, मृतदेह कुजून गेल्यानं त्याची ओळख पटवण्यात बराच वेळ गेला. अखेर दोन वर्षानंतर तो मृतदेह शीना बोराचा असल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, याप्रकरणी शीनाची आई इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी मुख्य आरोपी म्हणून समोर आले होते. 


काय आहे प्रकरण? 


24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची गळा आवळून हत्या केल्याची कबुली इंद्राणीच्या ड्रायव्हरने दिली होती. गाडीमध्ये गळा आवळून शीनाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोल टाकून तिचा मृतदेह रायगडजवळ जाळण्यात आला. शीनाची हत्या झाली, त्यावेळी इंद्राणी गाडीत असल्याची माहितीही ड्रायव्हरने दिली. शीनाचा मृतदेह 23 मे 2012 रोजी रायगडजवळ आढळून आला होता. हत्येप्रकरणी आधी शीना आई इंद्राणीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना याला कोलकातामधून अटक झाली होती. 


अपहरण आणि कारमध्येच हत्या 


वांद्र्याच्या नॅशनल कॉलेजबाहेरुन शीना बोराचं अपहरण करुन कारमध्येच गळा आवळून तिची हत्या केली. वाद मिटवण्यासाठी इंद्राणीने शीनाला मेसेज करुन वांद्र्याला बोलावलं होता, असं म्हटलं जातं. इंद्राणी मुखर्जीने पती पीटर मुखर्जी यांनाही अंधारात ठेवल्याचं उघड झालं. पहिलं लग्न लपवण्यासाठी, स्वत:च्या मुलीला बहिण सांगून, इंद्राणीनं पती पीटर यांना अंधारात ठेवलं होतं. इंद्राणीची मुलगी आणि पीटर मुखर्जींच्या मुलाचं प्रेमप्रकरण या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, इंद्राणीची मुलगी शीना आणि पीटर मुखर्जींच्या मुलाचं प्रेमप्रकरण होतं. म्हणजेच, इंद्राणी आणि पीटर या पती-पत्नींच्या मुलांचे आपापसात प्रेमसंबंध होते. त्या माय-लेकीच शीनाचा भाऊ मिखाईल बोरानेही शीना आणि इंद्राणी या माय-लेकीच असल्याचा दावा केला होता.