‘शौर्य चक्र’ने ज्यांचा गौरव होणार आहे, त्यात मेजर आदित्य कुमार आणि शहीद रायफलमन औरंगजेब यांच्या नावांचा समावेश आहे.
याच वर्षी 14 जून रोजी दहशतवाद्यांनी राष्ट्रीय रायफल्सच्या औरंगजेब खान यांचं अपहरण केलं आणि त्यांची हत्या केली. हत्येआधी दहशतवाद्यांनी औरंगजेब यांचा एका व्हिडीओ बनवला होता, ज्यात अनेक वेदना होत असतानाही औरंगजेब म्हणत होते की, होय, मीच दहशतवाद्यांना मारलं आहे.
समीर टायगर या दहशतवाद्याला ठार करणाऱ्या टीममध्ये शहीद औरंगजेब यांचाही समावेश होता. 30 एप्रिल रोजी सैन्याच्या एका चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर समीर टायगर आणि त्याचा सहकारी अकीब यांचा खात्मा करण्यात आला होता.
औरंगजेब शहीद झाल्यानंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण, लष्करप्रमुख बिपीन रावत आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी औरंगजेब यांच्या घरात जाऊन, नातेवाईकांचं सांत्वन केलं होतं.
कुणा-कुणाचा ‘शौर्य चक्र’ने गौरव होणार?
शिपाई ब्रम्हपाल सिंह यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ने गौरवण्यात येईल. तर 14 सैनिकांना ‘शौर्य चक्र’ने गौरवण्यात येईल. त्यांची यादी खालीलप्रमाणे :
- रायफलमन औरंगजेब (मरणोत्तर)
- लेफ्टनंट कर्नल अर्जुन शर्मा
- मेजर पवन गौतम
- मेजर आदित्य कुमार
- मेजर पवन कुमार
- कॅप्टन कनिंदर पाल सिंह
- कॅप्टन जयेश राजेश वर्मा
- नायब सुभेदार अनिल कुमार दहिया
- नायब सुभेदार विजय कुमार यादव
- हवालदार कुल बहादुर थापा
- हवालदार जावेद अहमद भट्ट
- गनर रंजीत सिंह
- रायफलमन निलेश भाई
- रायफलमन जयप्रकाश ओरांव