पाटणा : महायुती तोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार आणि जेडीयूचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांच्यात धुसफूस सुरुच आहे. आता शिस्तभंगप्रकरणी शरद यादव यांची जेडीयून हकालपट्टी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


पक्ष शरद यादव यांची राज्यसभेची खासदारकी रद्द करण्याची शक्यता आहे. पक्षादेशाचा उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांची सदस्यता रद्द होऊ शकते. त्यांच्या जागी नव्या नेत्याची निवड होईल, असं सांगितलं जात आहे.

बिहारच्या दौऱ्यावर
जेडीयूचे माजी अध्यक्ष असलेले शरद यादव आजपासून तीन दिवसांच्या बिहार दौऱ्याची सुरुवात करणार आहे. तसंच दिल्लीत 17 ऑगस्टला समान विचारांच्या नेत्यांची बैठकही त्यांनी बोलावली आहे.

अहमद पटेल यांना शुभेच्छा
गुजराज राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस नेते अहमद पटेल यांना मत दिल्याचा दावा करणारे पक्षाचे एकमेव आमदार छोटू भाई वसावा यांचंही शरद यादव यांनी समर्थन केलं होतं.

भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केल्याने शरद यादव यांनी आधीच नाराजी व्यक्त केली होती. आता 10 ते 12 ऑगस्टदरम्यान बिहार सात जिल्ह्यांमध्ये सामन्य नागरिकांशई संवाद साधणार आहे. यानंतर 17 ऑगस्टला 'सहद विरासत बचाओ सम्मेलन' बोलावलं आहे.  या संमेलनात विरोधी पक्षांच्या नेत्यांसह काही दलित तसंच अल्पसंख्यक नेतेही सामील होणार आहेत.

लालू यादव यांचं वक्तव्य
तर दुसरीकडे राजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनीही नितीश कुमारांनी शरद यादव यांना धोका दिल्याचं म्हटलं होतं. शरद यादव पाटण्याला आल्यानंतर जदयूचे कार्यकर्ते त्यांचा विरोध करतील आणि नितीश कुमार यांच्या इशाऱ्यावर त्यांच्यावर हल्लाही होऊ शकतो, असा आरोप लालू यादव यांनी केला आहे. त्यांच्या पक्षाची शरद यादव यांच्या जेडीयूशी युती कायम राहिल, असंही लालू म्हणाले होते.