हरिद्वार: शिर्डीच्या साईबाबांच्या पुजेमुळे महाराष्ट्रात दुष्काळ पडल्याचं अजब तर्कट द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केलं. ते हरिद्वारमध्ये बोलत होते.
फकीर असलेल्या साईबाबांना देशात देवासारखं स्थान मिळतं आणि ज्या ठिकाणी त्यांना देवाचं स्थान मिळतं तिकडेच निसर्गाचा प्रकोप होतो. महाराष्ट्रात पडणारा दुष्काळ हे त्याचंच उदाहरण असल्याचं शंकराचार्यांनी म्हटलं आहे.
याआधीही शंकराचार्यांनी 'साईबाबा हे देव नाहीत, त्यामुळे त्यांची पुजा करु नये.' असं फर्मानं काढलं होतं. ज्याला देशभरातून साईभक्तांनी विरोध केला होता. त्यातचं दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीशी साईबाबांचा संबंध जोडल्यामुळे साईभक्तांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.