Shankaracharya Swami Avimukteshwaranand : "आम्ही तज्ज्ञांना विचारलं की, सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानातून जाण्यापासून वाचवलं तर आमच्याकडे काय व्यवस्था आहे. त्यांनी सांगितलं आमच्याकडे कोणतीही व्यवस्था नाही. अशी व्यवस्था बनवण्यासाठी पैसा किती लागेल हे विचारुच नका. पैसा सगळा पुरवला गेला आणि पैशामुळे एक दिवसही काम थांबवलं नाही तरी त्यासाठी 20 वर्ष लागतील.. तेव्हा आम्ही सिंधू नदीचं पाणी रोखू शकू", असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले. ते पत्रकारांनी बोलत होते. 

Continues below advertisement

इथे कोणी लढलचं नाही, कोणी थांबवायचा प्रयत्न केला नाही : शंकराचार्य 

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, आपल्या घरात एक चौकीदार ठेवलेला असतो. आपण जर कुठे गेलेलो असलो आणि घरात काही दुर्घटना झाली तर आपण सर्वांत पहिल्यांदा कोणाला पकडणार? सर्वात पहिल्यांदा चौकीदारालाच पकडलं जाईल..त्याला विचारलं जाईल तुम्ही कुठे होता? तुम्ही असतानाही ही घटना का घडली? तुम्हाला कशासाठी ठेवलं होतं? मात्र, इथे तसं काहीच नाही. चौकीदार कामात पक्का असला तर त्याच्यावर कोणी आक्रमण करुन कोणी मारेल, तेव्हा चौकीदाराने सगळं निभावलं म्हटलं जाईल..इथे कोणी लढलचं नाही. कोणी थांबवायचा प्रयत्न केला नाही. ते आले घटना घडली..आणि आरामात निघून गेले... त्यांना काहीच बाधा आली नाही. चौकीदार कुठे आहे? आता म्हणत आहेत, आम्ही त्यांना धडा शिकवू.. पाकिस्तानातून आले होते हे तुम्हाला एवढ्या लवकर कसं समजलं? एवढ्या लवकर समजंत तर घटनेच्या अगोदर का समजलं नाही. पाकिस्तानातून आलेत तर पाकिस्तानावर तगडी कारवाई करा.

पुढे बोलताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, टेलिव्हिजनचे अँकर म्हणत आहेत, पाण्याच्या थेंबासाठी पाकिस्तान तरसेल.. एका ग्लास शुद्ध पाणी मिळणार नाही. शेती नष्ट होईल..हे होईल..ते होईल.. गजब सांगत आहेत. तज्ज्ञ सांगत आहेत, पाणी थांबवण्यासाठी कोणता उपायच नाही. मोठी घटना घडली आहे..आपण यातून शिकलं पाहिजे.. ज्यांच्याकडून चूक झाली, त्यांना शिक्षा देण्याची गरज आहे. त्यानंतर बाहेरच्या लोकांना दंडीत करा... 

Continues below advertisement

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बिनविरोध विजयावर सुप्रीम कोर्टाकडून प्रश्नचिन्ह; उमेदवाराला विजयासाठी किमान मतांची टक्केवारी अनिवार्य करण्याचा सल्ला