Local Terrorists List in Jammu Kashmir :  जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला मोठा दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) झाला. यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर भारत सरकार कठोर पावले उचलली आहेत. गुप्तचर तपास यंत्रणांनी जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) स्थानिक दहशतवाद्यांची यादी (Terrorists List) तयार केली आहे. हे स्थानिक दहशतवादी पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करतात. ते त्यांना आश्रय देतात आणि संसाधने देखील देत आहेत.


पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दल या दहशतवाद्यांवर एकामागून एक मोठी कारवाई करत आहेत. एक एक करून प्रत्येकाची घरे जमीनदोस्त होत आहेत. शनिवारी पुलवामा आणि कुलगाममधील दहशतवाद्यांची घरेही आयईडी स्फोटांनी उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर 14 दहशतवादी असून, त्यांची नावे समोर आली आहेत.


आदिल रहमान डेंटू 


आदिल रहमान डेंटू हा लष्कर-ए-तैयबा (एलईटी)चा सोपोर कमांडर आहे. तो 2021 पासून दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे. तो सोपोरचा जिल्हा कमांडर देखील आहे. तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत. 


आसिफ अहमद शेख 


जैश-ए-मोहम्मद (JeM) संघटनेचा दहशतवादी आसिफ अहमद शेख हा अवंतीपुराचा जिल्हा कमांडर देखील आहे. 2022 पासून ते सातत्याने दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे.


एहसान अहमद शेख


एहसान अहमद शेख पुलवामामध्ये सक्रिय असून तो लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आहे. 2023 पासून तो सातत्याने दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे. सुरक्षा यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत.


हरीश नजीर 


हरीश नजीर हा पुलवामा येथील दहशतवादी असून तो लष्कर-ए-तैयबाचा सक्रिय दहशतवादी आहे. ते सुरक्षा दलांच्या रडारवर आहे.


आमिर नजीर वानी


पुलवामामध्ये सक्रिय असलेला दहशतवादी आमिर नजीर वानी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहे. सुरक्षा दला त्याचा शोध घेत आहेत. 


यावर अहमद भट्ट 


जेईएमचा दहशतवादी यावर अहमद भट्ट पुलवामामध्ये पूर्णपणे सक्रिय आहे. भारतीय सुरक्षा दल त्याचा देखील शोध घेत आहे. 


आसिफ अहमद कंडे 


आसिफ अहमद कंडे हा शोपियानमधील दहशतवादी आहे. जुलै 2015 मध्ये तो हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. सध्या तो सक्रिय दहशतवादी म्हणून काम करत असून पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करत आहे.


नसीर अहमद वानी


नसीर अहमद वानी हा शोपियांमध्ये सातत्याने दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. तो लष्कर-ए-तैयबाचा सक्रिय सदस्य असून पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करतो. सुरक्षा दल त्याचाही शोध घेतच आहेत. 


शाहिद अहमद कुटे


शाहिद अहमद कुटे हा शोपियानमध्येही सक्रिय असून तो लष्कर आणि टीआरएफचा मोठा दहशतवादी आहे. 2023 पासून या क्षेत्रात सक्रिय आहे. सुरक्षा दल त्याचाही शोध घेत आहेत. 


आमिर अहमद दार 


आमिर अहमद दार हा स्थानिक दहशतवादी आहे. हे 2023 पासून शोपियानमध्ये सक्रिय आहे. ते लष्कर-ए-तैयबा आणि TRF च्या सहकार्याने काम करत आहे.


अदनान सफी दार 


अदनान सफी दार हा शोपियान जिल्ह्यातील सक्रिय दहशतवादी आहे. तो 2024 मध्ये दहशतवादी संघटनेत सामील झाला. सध्या तो लष्कर-ए-तैयबा आणि TRF सोबत सक्रियपणे काम करत आहे.


झुबेर अहमद वानी


झुबेर अहमद वानी हा हिजबुल मुजाहिद्दीनचा अनंतनागमधील ऑपरेशनल कमांडर आहे. तो सक्रिय A+ दहशतवादी आहे. तो दहशतवाद्यांचा मदतनीस म्हणून मोठ्या प्रमाणावर काम करतो. हा दहशतवादी 2018 पासून सक्रिय आहे.


हारुन रशीद गनी 


हारुन रशीद गनी हा अनंतनागमधील हिजबुल मुजाहिद्दीनचा सक्रिय दहशतवादी आहे. काही वर्षांपूर्वी तो पाकव्याप्त काश्मीरमध्येही गेला होता, तेथून त्याने प्रशिक्षण घेतले. सध्या सुरक्षा दल त्याचा शोध घेत आहेत.


झुबेर अहमद गनी


झुबेर अहमद गनी हा कुलगामचा मोठा दहशतवादी आहे. लष्कर-ए-तैयबामध्ये सामील होऊन तो सतत सुरक्षा दलांवर हल्ले आणि लक्ष्यित हत्यांमध्ये सहभागी असतो.



महत्वाच्या बातम्या:


Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगला स्थगिती; पर्यटकांना खोऱ्यात प्रवेश करण्यास बंदी