पणजी : गोव्यात प्रजासत्ताक दिनाला एका परदेशी पर्यटक महिलेवरील लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी इजिदोर फर्नांडिस (वय 44 वर्ष, हणजूण) या दुचाकी चालकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी इजिदोर फर्नांडिस गोव्याच्या हणजूण परिसरातील रहिवासी आहे.


अमेरिकन वंशाच्या महिलेने प्रजासत्ताक दिनी घडलेल्या या घटनेचा उल्लेख सोमवारी रात्री फेसबुक पोस्टमध्ये केला होता. यानंतर महिलेने इ-मेलद्वारे हणजूण पोलिसात तक्रार केली होती. यानंतर हे प्रकरण पेडणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं होतं.

प्रजासत्ताक दिनाला जोडून आलेल्या वीकेंडदरम्यान या महिलेचे गोव्यात वास्तव्य होते. या दरम्यान, पर्यटक महिलेने हडफडे येथून बागा येथे जाण्यासाठी दुचाकी पायलटला बोलावलं होतं. बागा इथे जात असताना पायलटने आपल्याला निर्जन स्थळी नेऊन अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

महिलेच्या तक्रारीनंतर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी इजिदोर फर्नांडिसला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.