नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटल आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मुखर्जी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत आज मालवली.  त्यांच्या निधनानंतर 31 ऑगस्ट 2020 ते 06 सप्टेंबर 2020 असा सात दिवसाचा शासकीय शोक देशभर पाळण्यात येणार आहे.


देशभरातील इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल, मनोरंजनाचा कोणताही शासकीय कार्यक्रम होणार नाही.  शासकीय इतमामात करण्यात येणाऱ्या अंत्यसंस्काराची तारीख आणि वेळ नंतर जाहीर करण्यात येईल.


Pranab Mukherjee | देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन


प्रणव मुखर्जी यांना 10 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच दिवशी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान एक दिवस आधी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.


खासदार ते राष्ट्रपती : प्रणव मुखर्जी यांचा राजकीय प्रवास


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. देशाच्या विकासाच्या मार्गावर त्यांनी छाप सोडली आहे. एक विद्वान, एक राजकारणी त्यांचे समाजातील सर्व घटकांनी कौतुक केले.