नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. 31 डिसेंबरपर्यंत रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बूकिंगवर कसलाही अधिभार लागणार नाही, अशी घोषणा आयआरसीटीसीने केली आहे.
ऑनलाईन व्यवहार वाढण्याच्या दृष्टीने रेल्वेने हे पाऊल उचललं आहे. यापूर्वी काऊंटरवर रेल्वेचे तिकीट जास्त प्रमाणात बूक केल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे रेल्वेने प्रवाशांना ऑनलाईन व्यवहाराकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर रेल्वे तिकीटासाठी जुन्या नोटा स्वीकारण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र अनेकांनी जुन्या नोटा खपवण्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंतचं रेल्वे तिकीट बूक केलं. तिकीट रद्द करुन रिफंड मिळवण्याची शक्कल लढवली. मात्र रेल्वेने ही कल्पना वेळीच मोडून काढली.