नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑनलाईन तिकीट बूक करताना जो सर्व्हिस चार्ज आकारला जातो. तो नोटाबंदीनंतर रद्द करण्यात आला होता. त्याची मुदत आता पुन्हा सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर ऑनलाईन तिकीट बूक करताना 20 ते 40 रुपये प्रती तिकीट सर्व्हिस चार्ज आकारला जातो. त्यामुळे आता प्रत्येक तिकिटावर 40 रुपयांपर्यंत बचत होईल. या निर्णयानंतर आयआरसीटीसीला 500 कोटी रुपयांचं नुकसान होईल, असा अंदाज बांधला जात आहे.
नोटाबंदीनंतर कॅशलेसला चालना देण्यासाठी रेल्वेने नोव्हेंबर 2016 ते मार्च 2017 पर्यंत सर्व्हिस चार्ज रद्द केला होता. मार्चनंतर ही मुदत पुन्हा 30 जून 2017 पर्यंत वाढवण्यात आली आणि आता ऑनलाईन तिकीट बूक करणाऱ्या प्रवाशांसाठी पुन्हा एकदा सप्टेंबर 2017 पर्यंत ही सर्व्हिस चार्ज रद्द केला आहे.